Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aarati Saibaba from album Ganapati Aarti

Lyrics of Aarati Saibaba from album Ganapati Aarti

आरती साईबाबा



आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा ।
चरणरजातळीं । द्यावा दासां विसांवा।
भक्तां विसांवा। आरती साईबाबा ॥धृ॥

जानियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग ।
मुमुक्षुजनां दावी । निज डोळां श्रीरंग ॥
आरती साईबाबा ।। १ ।।

जया मनीं जैसा भाव । तया तसा अनुभव ।
दाविसी दयाघना ।
ऐसी तुझी ही माव ॥
आरती साईबाबा ॥ २ ॥

तुमचे नाम ध्यातां ।
हरे संती व्यथा ।
अगाध तब करणी ।
मार्ग दाविसी अनाथा ॥
आरती साईबाबा ॥३॥

कलियुग अवतार । सगुण ब्रह्म साचार ।
अवतीर्ण जाहलासे । स्वामी दत्तदिगंबर ॥
आरती साईबाबा ॥ ४ ॥

आठां दिवसां गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥
आरती साईबाबा ॥ ५ ॥

माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणरजसेवा ।
मागणें हेंचि आतां । तुम्हां देवाधिदेवा ॥
आरती साईबाबा ॥६॥

इच्छित दीन चातक । निर्मळ तोब निजसुख ।
पाजाव माधवा या । सांभाळ आपली ही भाक ॥
आरती साईबाबा ॥ ७ ॥