Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aamhi Nachu Aamhi Gau from album Ovalu Aarti

Lyrics of Aamhi Nachu Aamhi Gau from album Ovalu Aarti

६. आम्ही नाचू आम्ही गाऊ



आम्ही नाचू आम्ही गाऊ,
नाचू नाचू, आम्ही नाचू नाचू।
आनंदाने करीतो, आरती गाऊ गाऊ ।।ध्रृ।।

ऐकिता रे शब्द तुझे
भान हरपले, देवा भान हरपले ।
पाहता रे रुप तुझे
शब्द हरवले ।।१।।

नामरुपे जरी अनेक असती
मजसी तू प्रिय, देवा मजसी तू प्रिय ।
तूची मूळ, तूची बीज
तूची वृक्ष साचार ।।२।।

क्षणोक्षणी गोड भक्तीचा
रस हा पाजिसी, देवा रस हा पाजिसी ।
अनिरुद्धा तू कृपा करोनी ।
भक्ता आठवसी ।।३।।