Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aala Sahaj Hast Tujha from album Pipasa 3

Lyrics of Aala Sahaj Hast Tujha from album Pipasa 3

आला सहज हस्त तुझा



आला सहज हस्त तुझा ।
मस्तकावरी माझ्या ।
नाही जरी वंदिले मी ।
तुजसी अनिरुद्धा ॥

फक्त तुझ्या डोळ्यामध्ये ।
रोज रोज पाहत होतो ।
चित्र नव्हे तूचि अससी ।
एवढेच मानत होतो ॥

तुझी चालण्याची ऐट ।
वारंवार पाहू वाटे ।
तुझ्या बोलण्याची मोट ।
भरभरूनी बाग थाटे ॥

श्रम तुझे पाहताना ।
डोळा पाणी येत होते ।
क्षमा तुझी अनुभवताना ।
मन नमन विसरत होते ॥

अनिरुद्धा खूण तुझी ।
तूचि दिली रे अंतरी ।
पिपा ऐके ‘माझी माझी’ ।
चुकली तरी बाळे खरी ॥