Lyrics of Aahe Bhakta Taranya Siddha from album Ailatiri Pailatiri

17. आहे भक्ता तारण्या सिद्ध
आहे भक्ता तारण्या सिद्ध माझा अनिरुद्ध ।
माझा अनिरुद्ध, साई अनिरुद्ध।
करी दुष्टांचे मर्दन आणि संतांचे रक्षण ।
देव आहे माझा सिद्ध माझा अनिरुद्ध ॥
किती वर्णू याच्या लीला, सार्या जगता हा व्यापिला।
सुख शांती देण्या आला, माझा अनिरुद्ध ॥
ह्यासी शरण जो आला, त्याचा वनवास संपला।
आहे भावाचा भुकेला, माझा अनिरुद्ध ॥
जगी अनाचार माजला, दीनदुबळ्या त्रास झाला।
धर्मरक्षणासाठी आला, माझा अनिरुद्ध ॥
नित्य स्मरे माझ्या बापूला, पथ प्रगतीचा गवसला ।
मनःसामर्थ्य देण्या आला, माझा अनिरुद्ध ॥